Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी ? आमदारांना गाजर का ?
    राजकारण

    शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी ? आमदारांना गाजर का ?

    editor deskBy editor deskOctober 20, 2022Updated:October 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला १०० दिवसापेक्षा जास्त दिवस होवूनही अजूनही मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. पहिला मंत्रिमंडळ विस्तारसुद्धा जवळपास महिना – दीड महिन्याने झाला. आता पुढचा कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, शिंदे गटातल्या नाराज आमदारांना नवं गाजर दाखवण्यात येणार असल्याची माहिती हाती येत आहे.

    शिंदे गटातले अनेक माजी मंत्री पुन्हा संधी न मिळाल्याने नाराज आहेत. अनेकजण सातत्याने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत असतात. सध्या मंत्रिमंडळात २० मंत्री आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत.  अजूनतरी मंत्रिमंडळ विस्ताराचा जवळचा मुहुर्त दिसत नाही. त्याऐवजी अशा नाराज आमदारांकडे विविध महामंडळांची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. जबाबदारीही द्यायची आणि नाराजीही दूर करायची असा दुहेरी नेम शिंदे – फडणवीस या माध्यमातून साधणार असल्याची चर्चा आहे. राज्यातल्या विविध महामंडळांची अध्यक्षपदे असंही रिक्त आहे. कोरोनामुळे महाविकास आघाडी सरकारने या नियुक्त्यांबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे आता शिंदे – फडणवीस सरकार या रिक्त अध्यक्षपदी नाराज आमदारांना बसवणार आणि त्यांची नाराजी दूर करणार, असं नियोजन करत असल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटातले मंत्री उदय सामंत यांनीही असेच संकेत दिले होते. महामंडळ नियुक्त्यांवरुन लवकरच निर्णय घेतला जाईल, असं विधान त्यांनी केलं होतं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.