Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जे आमदार शिंदे सोबत गेले त्यांना पश्चताप होत आहे : जयंत पाटील
    राजकारण

    जे आमदार शिंदे सोबत गेले त्यांना पश्चताप होत आहे : जयंत पाटील

    editor deskBy editor deskOctober 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी व शिंदे – फडणवीस सरकारच्या आमदारांमध्ये चांगलाच सामना राज्यातील जनतेला पाहायला मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

    पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीय. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले, त्यांनी काही ना काही उद्देश व लाभ ठरवून गेले आहेत, हे जनतेच्या लक्षात आलं आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळं पुढच्या काळात चित्र वेगळं असेल, असं विधान जयंत पाटील यांनी केलंय. जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची पावसामुळं झालेली प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारनं जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होतं. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचं दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका पाटील यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नामोहरम करणं आणि त्यांना अडचणीत आणणं असा उद्योग काही लोक करत आहेत. परंतु, त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत, असंही पाटील म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.