Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आ.खडसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट ?
    क्राईम

    आ.खडसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट ?

    editor deskBy editor deskOctober 17, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज दि १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचण्यात येत असून यावर तत्काळ कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

    निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवेदन सादर की, महाराष्ट्राचे नेते माजी महसुलमंत्री तथा विद्यमान विधान परीषद नेते आ. एकनाथराव खडसे हे गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात व समाजसेवेत काम करीत आहे. वेळोवेळी त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांने त्यांनी महाराष्ट्रात आपले स्थान पक्के केले आहे. मागील काळात त्यांनी सत्ता स्थापनेपर्यंत भारतीय जनता पार्टीला पोहचविले होते परंतु पक्षातीलच काही महत्वाकांक्षी नेत्यांनी त्यांना विविध गुन्ह्यात व विविध प्रकारच्या तपास यंत्रणांना मागे लावून त्यांना राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करून पाहीला पण न्यायव्यवस्थेने त्यांना त्यात अपयश दिल्याने ते हवालदिल झाले. परंतु त्याच प्रवृत्ती परत राज्याच्या सत्तेत पैश्याच्या व तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून फोडाफोडीच्या, डावपेचाच्या सत्तेत आल्याने आता परत आमदार एकनाथराव खडसे साहेब यांना ऐनकेन प्रकारे संपविण्याचा डाव रचला आहे. खडसे साहेबांसारखा खमका विरोधाक राजकारणातून संपविल्याशिवाय देशात, राज्यातील विविध निवडणूका. जिल्ह्यातील विविध स्थानीय स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, यातील आगामी काळात होणाऱ्या निवडणूकात यश मिळवून सत्ता प्राप्त होणार नाही असे लक्षात आल्याने व खड़से सो. विधान परिषद सदस्य झाल्याने सभागृहात सत्ताधाऱ्यांना उघड पाडल्याशिवाय राहणार नसल्याने तसेच गेल्या तीन महिन्यात खडसे सो. यांनी जळगाव जिल्ह्यात वेगवेगळी आंदोलने काली करून सरकारला उघडे पाडले आहे. आर.टी.ओ. खात्यातील घोटाळे, बी.एच.आय. मधील घोटाळे, जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे (गुटखा, सट्टा, जुगार, बाळू उपसा) मागील काळात राज्यात व जिल्ह्यात करण्यात आलेले घोटाळे इ. प्रकरणाला वाचा फोडल्याने एकनाथराव खडसे व त्यांच्या परिवारातील राजकारणात प्रमाण कारणात, सहकार इत्यादीत व्यस्त असलेल्या व्यक्तींना येनकेन प्रकारे बदलिय करण्याचा प्रयत्न राज्यातील व जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे. परंतु जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने व संत मुक्ताबाईच्या कृपादृष्टीने अशा घाणेरड्या प्रवृत्तींना तोंडघाशी पाडण्यात एकनाथराव खडसे परिवार पुरून उरला आहे. याकरिता राज्यातील व जिल्ह्यातील सत्ताधारी यांनी एखादी मोठ्या तथाकथीत फौजदारी गुन्ह्यात अडकविण्याचा घाट घालण्यात आल्याचा बातम्या प्रसार माध्यमात व चर्चेतून व काही पोलीस अधिकारी खाजगी स्वरूपात माहीती देत असून स्थानीय गुन्हे शाखेतील काही पोलीस कर्मचान्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात कट रचण्यात येऊन गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अडकविण्याचा घाट घालण्यात येत असल्याचे कळत आहे. या करीताच त्यांनी वेळोवेळी शासनाने पुरविलेल्या विविध सुरक्षा ही काढण्यात आल्या असून त्यांच्या जिवाला धोकाही पोहचविण्याचा इरादा या प्रवृत्तीच्या इसमांनी घातलेला असू शकतो. सत्ताप्राप्ती करिता हे कोणत्याही थराला पोहचू शकतात.

    अशा या प्रवृत्तींचा आम्ही राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे जाहीर निषेध करतो. आमदार एकनाथराव खडसे यांच्या जिवीतास काही हानी पोहचल्यास राज्यातील व जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरण्यात येईल. या कामात अपयश आल्यास आमदार एकनाथराव खडसे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना विविध खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचत असल्याने यांच्या प्रयत्नांना वेळीच आळा घालावा अशी मागणी आपणाकडे या निवेदनामार्फत आपणाकडे करण्यात येत आहे. आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास खडसे साहेबांवर कोणत्याही प्रकारे खोटे व बिनबुडाचे आरोप व गुन्हे दाखल केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

    निवेदनावर जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, योगेश देसले, अशोक लाडवंजारी, संजय जाधव, मजहर पठाण, विशाल देशमुख, अशोक सोनवणे, पी.एस.पाटील, युवराज सुरवाडे, संजय चव्हाण, राजू मोरे, लीलाधर तायडे यांच्यसह पदाधिकारी व कार्यकर्तेच्या स्वाक्षऱ्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.