Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ठाकरे गट व भाजप मैदानात : शक्ती प्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज
    राज्य

    ठाकरे गट व भाजप मैदानात : शक्ती प्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज

    editor deskBy editor deskOctober 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत असून, ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यातच थेट लढत होणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थित अर्ज दाखल करणार आहेत. येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या रॅलीमध्ये आदित्य ठाकरेंसह नेते मंडळी आपले शक्तीप्रदर्शन करणार तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आशिष शेलार उपस्थित राहणार आहे.
    तत्पूर्वी रॅली काढून शक्तीप्रदर्शनही महाविकास आघाडीच्या वतीनं केलं जाणार आहे. दुसरीकडे मुरजी पटेल १३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. तेही आज अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर होत असलेल्या पहिल्या निवडणुकीत जनमत कुणाला कौल देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’च्या उमेदवार ऋतुजा लटके, तर भाजपकडून मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल होण्यापूर्वी महाविकास आघाडी आणि भाजप प्रणीत महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय.
    ऋतुजा लटकेंचा अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीकडून रॅली काढण्यात आली. या रॅलीत आदित्य ठाकरे, अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह महाविकास आघाडीतले नेते सहभागी झालेत. तर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काढलेल्या रॅलीत आशिष शेलार, शिंदे गटाचे दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्यासह इतर नेते सहभागी झालेत. ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या नोकरीचा राजीनामा महापालिकेकडून स्वीकारण्यात आलाय. उच्च न्यायालयाने यासंदर्भात महापालिका प्रशासनाला आदेश दिले होते. ११ वाजेपर्यंत राजीनामा मंजूरीचं पत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं होतं. आज राजीनामा स्वीकारण्यात आल्याचं पत्र ऋतुजा लटकेंना देण्यात आलंय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.