Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » समाजवादी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच निधन
    राजकारण

    समाजवादी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच निधन

    editor deskBy editor deskOctober 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    26 सप्टेंबरपासून गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्षाचे नेते ८२ वर्षीय मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. यादव यांना युरिन इन्फेक्शन झाल्यामुळे बऱ्याच दिवसापासून ते उपचासाथी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवर मुलायम यांच्या निधनाची माहिती दिली. मुलायम यांच्या पार्थिवावर मंगळवारी सैफई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये रुग्णालयात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं ८२ वर्षांचे असताना मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारांदरम्यान त्यांच निधन झालं आहे. मुलायमसिह यादव तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते. १९९२ साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत या पदावर कार्यकरत होते. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.