Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ खून प्रकरणी एक ताब्यातगुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
    क्राईम

    ‘त्या’ खून प्रकरणी एक ताब्यात
    गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 6, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भादली येथील पाटावर दि ३ रोजी जळगाव येथील तरुणाची हत्या करून मयताची प्रेत त्या ठिकाणी मिळून आल्याने घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी यांनी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना सदर गुन्ह्या उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि जालींदर पळे, पोउपनिरी अमोल देवढे, सफी रवि नरवाडे, पोह संजय हिवरकर, राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदिप सावळे, पोना रणजीत जाधव, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर बारी, रमेश जाधव यांचे पथक नेमण्यात आले होते.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मयत सौरभ यशवंत चौधरी व त्याचा साथीदार ईश्वर नथ्थु सपकाळे हे नेहमी सोबत राहत असून साधारण ४ ते ५ दिवासापूर्वी या दोघांचा वाद झाला होता. अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी पथकासह ईश्वर नथ्थू सपकाळे याचा शोध घेतला असता. तो दिनांक १३ रोजी सकाळपासून घरी नव्हता. त्यावेळी त्याचे घरच्यांना त्याबाबत विचारपुस केली असता तो कुठे गेला याबाबत सांगता येणार नाही असे सांगीतले.

    कानळदा येथील ईश्वर नथ्थु सपकाळे त्याचा सदर भागात शोध घेतला असता तो आज रोजी दिनांक ०६ रोजी कानळदा शिवारात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी विचारपुस केली असता. ईश्वर नथ्थ्य सपकाळे याने कळविल की, मयत सौरभ यशवंत चौधरी, रा दशरथ नगर जळगाव याने माझे कडून हात उसनवार पैसे घेतले होते. दिनांक ०२ रोजी ०९.३० वाचे सुमारास मोटार सायकल मी व मयत सौरभ चौधरी असे श्रीराम चौक जनाबाद येथून निघुन भादली येथील पाटचारीवर बसून गप्पा मारत असतांना मी मयत सौरभ चौधरी यास हातउसनवारीचे पैसे मागण्यास गेलो असता आमच्या दोघात वाद होवून भादली ता. जि. जळगाव येथील पाटचारी जवळ धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने त्यास मारून जिवेठार केले बाबत सांगत असून गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.