Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात पती पत्नीतील वाद टोकाला…संतापात पतीने वायरने केला पत्नीचा गळा आवळून खून
    क्राईम

    जळगावात पती पत्नीतील वाद टोकाला…संतापात पतीने वायरने केला पत्नीचा गळा आवळून खून

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 1, 2022Updated:October 1, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निमखेडी शिवारातील घटना,आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    जळगाव शहरातील आहुजा नगर परिसरातील शिवधाम मंदिरासमोरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये पतीने पत्नीचा मोबाईल चॉर्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कविता जितेंद्र पाटील वय २० असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर जितेंद्र संजय पाटील वय २५ असे संशयित पतीचे नाव आहे. जितेंद्र हा पत्नीला गळफास दिल्यानंतर स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाल्याची ही माहिती मिळाली आहे.

    पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत जितेंद्रला माहिती कळाली होती, त्याने स्वत:च पत्नीला तरुणासोबत रंगेहाथ पकडले होते. यावरुन जितेंद्र व कविता यांच्यात वाद होत होते, या वादातून कविता ही जितेंद्रला आत्महत्येची तसेच तुमचे सर्वांचे नाव टाकून देईन अशी धमकी देत होती. याचवरुन आज शनिवारी सायंकाळी जितेंद्र कविताला समजावित होता, त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला, वादात कविताने नेहमीप्रमाणे जितेंद्रला आत्महत्येची धमकी दिली. यामुळे संताप अनावर झाल्याने जितेंद्र याने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने पत्नी कविता हिचा खून केला. व खून केल्यानंतर पेालिसात हजर झाला. ही माहिती जितेंद्र याने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

    नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, आहुजा नगर परिसरात ब्रह्मांडनायक अपार्टमेंट असून अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र संजय पाटील हा पत्नी कविता व दीड वर्षाची मुलगी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. जितेंद्र हा मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह भागवितो. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पती जितेंद्र याचा पत्नीसोबत वाद झाला. या वादातून जितेंद्र याने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने पत्नी कविता हिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती जितेंद्र हा स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. व त्यानेच पोलिसांना मी पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. तातडीने कविता हिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.