Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वारसा मैदानाचा नसतो…; मनसेने पुन्हा डीवचलं
    राजकारण

    वारसा मैदानाचा नसतो…; मनसेने पुन्हा डीवचलं

    editor deskBy editor deskSeptember 24, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद आता संपला असून काल (शुक्रवारी) मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात असून शिंदे गट याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    दसरा मेळाव्याची परवानगी मिळाल्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या असून ‘‘दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी दसरा मेळाव्यासाठी उत्साहात, गुलाल उधळत वाजत गाजत या’’ असं ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत. तर ‘वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो’ असा टोला मनसेच्या संदीप देशपांडे यांनी लावला आहे.

    दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दसरा मेळाव्यासाठीच्या परवानगीवरून वाद सुरू होता. महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारल्यानतंर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तर काल झालेल्या सुनावणीत कोर्टाने महापालिकेविरोधात निर्णय देत ठाकरे गटासाठी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

    शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणे हा शिवसेनेचा वारसा आहे असं शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असून मनसेकडून आता शिवसेनेला डवचण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण भाजपशी युती करणार नसल्याचं मनसेने स्पष्ट केलं होतं. येणाऱ्या निवडणुकांत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता असून विदर्भ दौऱ्यात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    भोंदू बाबा प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक; “मला बदनाम करण्यामागे भाजपचा अजेंडा”

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.