Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन डॉक्टर मित्र अपघातात ठार ; दुचाकी व बसची झाली धडक
    आरोग्य

    दोन डॉक्टर मित्र अपघातात ठार ; दुचाकी व बसची झाली धडक

    editor deskBy editor deskSeptember 24, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    शिरपूरकडे जाणाऱ्या बुलेटला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बुलेटवरील डॉक्टर असलेले दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना अमळनेर जवळील बेटावद रस्त्यावरील हॉटेल माधवी जवळ घडली आहे.

    यात डॉ. महेंद्र शांतीलाल बोरसे (वय-३९) रा. पाडसे ता. अमळनेर व त्यांचा मित्र डॉ. अरूण नथ्थू साळुंखे (वय-३८) रा. हिंगोण खुर्द ता. अमळनेर असे मयत झालेल्या दोन्ही डॉक्टारांची नावे आहेत.

    याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. अरूण नथ्थू साळुंखे हे शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बुलेट क्रमांक (एमएच १८ एव्ही ३११) ने अमळनेर- बेटावद रस्त्याने शिरपूरकडे जात होते. ब्राम्हणे फाट्याजवळील हॉटेल माधवी जवळ समोरून येणारी शिरपूर – अमळनेर बस क्रमांक (एमएच २० बीएल ३९८१) ने बुलेटला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बुलेटवरील डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. अरूण साळुंखे हे जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली. ही बस दुसऱ्या बसला ओव्हरटेक करत असतांना हा भीषण अपघात झाला आहे..

    अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. याप्रकरणी रविंद्र जगन्ना मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किशोर पाटील करीत आहे. दरम्यान पाडसे येथील डॉ. महेंद्र बोरसे हे परिसरात मनमिळाऊ असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पच्यात आई वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ तर अरुण साळुंके यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.