Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेम काय असतं…; महिला IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला Romantic video तुफान व्हायरल
    सामाजिक

    प्रेम काय असतं…; महिला IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला Romantic video तुफान व्हायरल

    editor deskBy editor deskSeptember 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    IAS-IPS अधिकारी म्हटलं की एक अभ्यासू, शिस्तप्रिय, कठोर अशी व्यक्ती समोर येते. असे अधिकारी त्यांच्या जबरदस्त कामगिरीसाठी आणि धडाकेबाज निर्णयासाठी प्रसिद्ध असतात. पण सध्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याने आपल्या वेगळ्याच गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो तुफान व्हायरल होतो आहे.

    महिला आयएएस अधिकाऱ्याने आपल्या सोशल मीडियावर प्रेमाचा एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. खरं प्रेम म्हणजे काय असतं, हे दाखवण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्याने केला. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. डॉ. सुमिता मिश्रा असं या आयएएस अधिकाऱ्याचं नाव. डॉ. मिश्रा या हरयाणातील अॅग्रीकल्चर आणि फार्मर्स वेल्फेअरच्या अॅडिशनल चीफ सेक्रेटरी आणि हरयाणा पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या चेअरमन आहेत.
    त्यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केलेला व्हिडीओ तुम्ही पाहिला तर त्यात तुम्हाला एक वृद्ध दाम्पत्य दिसेल. व्हिडीओत पोस्ट दोघंही एकमेकांसमोर जमिनीवर बसले आहेत. आपल्या थरथरत्या हातांनी महिला आपल्या नवऱ्याला जेवण भरवते आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘एक प्यार का नगमा है’ गाणं ऐकू येतं आहे.

    कोई पूछे कि प्यार क्या होता है तो बता देना प्यार इस उम्र में और यह होता है॥ pic.twitter.com/gOgFaqfJqp

    — Dr Sumita Misra IAS (@sumitamisra) September 18, 2022

     

    “कुणी विचारलं की प्रेम काय असतं तर बस्सं या वयात आणि असं असतं हे सांगा”, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

    आयएएस अधिकाऱ्याने शेअर केलेला हा प्रेमाचा व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावुक झाले आहेत. वृद्ध दाम्पत्यातील हे असं प्रेम अनेकांना भावलं आहे. हेच खरं प्रेम आहे, याच्याशी अनेकजण सहमत झाले आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.