Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जेवणालाही राजकारणाचा तडका : व्हेज ‘४० गद्दार थाळी’ सह नॉनव्हेज ’50 खोके एकदम ओके’ थाळी
    राजकारण

    जेवणालाही राजकारणाचा तडका : व्हेज ‘४० गद्दार थाळी’ सह नॉनव्हेज ’50 खोके एकदम ओके’ थाळी

    editor deskBy editor deskSeptember 16, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पंढरपूर : वृत्तसंस्था

    आतापर्यंत आपण पाहिले असेल बुलेट, बाहुबली थाळीनंतर आता 40 गद्दार थाळी आणि 50 खोके एकदम ओके थाळी खवय्यांसाठी लक्षवेधी ठरत आहे. राज्यामध्ये बुलेट थाळी, बाहुबली थाळी अशा अनेक थाळ्या प्रसिद्ध झाल्या. यानंतर आता पंढरपूर- सांगोला रस्त्यावर 40 गद्दार थाळी आणि 50 खोक्के एकदम ओके थाळी प्रवाश्यांसह, पंढरपूर वासियांचे लक्ष वेधून घेत आहे.

    मार्केटिंगसाठी कायपण हे आपण नेहमीच पाहत आलो आहोत. अशीच एक भन्नाट कल्पना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मार्केटमध्ये आणली आहे. पंढरपुरातील हॉटेलमध्ये त्यांच्याकडून 40 आणि 50 रुपयांना थाली देण्यात येत आहे या थालीचे नाव 40 गद्दार आणि 50 खोके असे देण्यात आल्याने महाराष्ट्रभर तिची चर्चा सुरू आहे.

    राज्यात सत्तांतर झाले. यानंतर शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांना सातत्याने गद्दार म्हणून हिणवले गेले. ह्याच 40 गद्दारांच्या नावाने शाकाहारी थाळी तयार झाली. तर विधानसभेच्या आवारात ’50खोके एकदम ओके’ नावाने झालेल्या घोषणावरुन अनोखी मांसाहरी थाळी तयार करण्यात आली आहे.

    विशेष म्हणजे राज्यातील वेगवेगळ्या थाळ्यामध्ये शिवसेनेची 40 गद्दार थाळी आणि 50 खोके एकदम ओके थाळी निश्चितच चर्चेचा विषय ठरत आहे. सांगोला रस्त्यांवर असलेल्या दत्तात्रय यादव आणि बंडू घोडके यांच्या हॉटेल शिवमवर ही थाळी सध्या उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे ह्या थाळीची किमंत 40 रु व 50 रु अशी ठेवण्यात आली आहे.
    पंढरपूर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय घोडके यांच्या संकल्पनेतून ही थाळी निर्माण केली आहे. सांगोला मतदारसंघाचे सेनेचे गद्दार आमदार शहाजीबापू पाटील यांनीही कडवट शिवसैनिकाच्या हातच्या प्रामाणिक अन्नाची चव चाखावी अशी मिश्किल टीपन्नी हॉटेल चालकाकडून होतो आहे. ह्या थाळीवर सध्या खवय्येगिरी चांगलाच ताव मारताना पहायला मिळत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.