Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजिंठा चौकातील बाफना शोरूम समोरून तरूणाची दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
    क्राईम

    अजिंठा चौकातील बाफना शोरूम समोरून तरूणाची दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव: शहरातील अजिंठा चौकातील बाफना शोरून समोरून एका तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वैभव हरीदास निंबाळकर (वय-२४) रा. कानळदा रोड, शिवाजी नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार ६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वैभव निंबाळकर हा (एमएच १९ सीएस ४०७१) क्रमांकाची दुचाकी घेवून अजिंठा चौकातील बाफना कंपनीच्या समोर आला होता. त्यावेळी दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. वैभवने सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतू त्याला दुचाकी कुठेही मिळाली नाही.पाच दिवसानंतर रविवारी ११ सप्टेबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.