Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निमखेडी शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
    क्राईम

    निमखेडी शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 7, 2022Updated:September 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निमखेडी शिवारातील पाणी पाऊच फॅक्टरीजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीसांनी पकडले आहे. याबाबत मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.

    पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमखेडी शिवारातील पाणी पाऊच फॅक्टरजवळून ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतूकीबाबत कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रक्टर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जमा केले आहे. पोलीस नाईक दिपक कोळी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विलास शंकर सपकाळे (वय-३०) रा. साईबाबा मंदीराजवळ, निमखेडी शिवार, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सतिष हारनोळ करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरघोस नफ्याचे आमिष; तरुणाला ९७.५० लाखांचा ऑनलाइन गंडा

    June 28, 2026

    गिरणा नदीपात्रातील वाळूमाफियांवर पोलिसांचा दणका; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

    June 28, 2026

    दोन मित्रांमध्ये पैश्यांवरून वाद : एकाने संपविले आयुष्य !

    June 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.