Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात आ.अमोल मिटकरी राज्य सरकारवर बरसले
    जळगाव

    जिल्ह्यात आ.अमोल मिटकरी राज्य सरकारवर बरसले

    editor deskBy editor deskAugust 30, 2022No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवार साहेबांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झालेला तुमचा आमदार, जो पवार साहेबाना झाला नाही, स्वतःला बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक म्हणवणारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना झाला नाही… तो आता बंडखोर शिंदे गटात सामील झाला आहे, हा आमदार थोड्याच दिवसात भाजपात गेल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागताच १६ बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई होऊन राज्यातील असंविधानिक सरकार कोसळेल.पन्नास खोके एकदम ओक्के” यात काय दडलंय हे सारी जनता जाणून आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील जनता गद्दारांना माफी करणारच नाही.” या मतदार संघातही आमदार चंदू पाटीलको करारा जबाब मिलेगा….. असे सांगून ५० खोके घेऊन ते जनतेचं प्रेम विकत घेऊच शकत नाही. पुढील काळात भैय्यासाहेब आणि नाथाभाऊंवर प्रेम करणाऱ्या जनसामान्यांनी नाथाभाऊप्रमाणेच करारी बाणा असलेल्या रोहिणीताई खडसेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील १८२ गावांमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टपासून जनसंवाद यात्रा सुरु आहे. यात्रेच्या आठव्या दिवशी शेलवड ता. बोदवड येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

    ते पुढे म्हणाले की, सध्या देशात जे सुरु आहे, ते लोकशाहीला अतिशय घातक आहे. लोकशाहीची पायमल्ली करून आता जळी -स्थळी -काष्टी -पाषाणी, अक्षरशः चंद्रावर सुद्धा भाजपाचेच सरकार असावे यासाठी अघोरी प्रयत्न सुरु आहेत. ईडी, सीबीआय, आयटी आदी संस्था हाताशी धरून मोदी सरकारने विरोधक संपवण्याचे काम चालवले आहे. ज्या किरीट सोमय्याने याआधी प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी यांचेवर आरोप केले, ही मंडळी शरण जाताच तो आता गुपचूप बसलाय हे समजण्याइतपत जनता खुळी नाही. महागाई, बेरोजगारी याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही.असा आरोप त्यांनी केला.

    यावेळी सरकारमध्ये शिंदे गटासह भाजपा मध्ये आमदारंमध्ये प्रचंड नाराजी आहे. मलाईचे खाते मिळाले नाही म्हणून मंत्री नाराज, तर मंत्री पद मिळाले नाही म्हणून आमदार नाराज… अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कोर्टामध्ये अपात्रतेची टांगती तलवार १६ सदस्यांवर आहे… निकाल लागताच राज्यातील सरकार कोसळणारच असा दावा, मिटकरी यांनी केला. याप्रसंगी मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, मंत्री संदीपान भुमरे यांच्या दौऱ्यावरही टीका केली.

    भारत देश कृषी प्रधान असून शेती करणारे सगळेच लोक हिंदू आहेत. हाच हिंदू समाज धोक्यात आला आहे. बियाणे,खते आणि फवारणीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शेत मालाला भाव नाही… अनेक जण कर्जबाजारी झाल्याने जीवनयात्रा संपवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हिंदुत्वाचा सत्तेसाठी वापर करणार्यांना हे हिंदुत्व दिसत नाही का?? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण भाषणात शेर शायरी करत त्यांनी तुफान फटके बाजी करून सभा जिंकली.

    २०१९ च्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी लढवत असतांना सौ रोहिणीताई खडसें अवघ्या १८०० मतांनी पराभूत झाल्यात. त्यांचा झालेला पराभव एका दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडला. कारण त्या पराभूत झाल्या नसत्या तर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नसता. त्यांच्या रूपाने रा. कॉ. नेत्या सुप्रियाताई सुळे यांचे प्रमाणेच कणखर, लढवय्ये, आक्रमक आणि जनसेवेसाठी तत्पर असं नेतृत्व राष्ट्रवादीला मिळालं आहे. ज्या नाथाभाऊनी पक्षवाढीसाठी जीवाचे रान केले, त्याच पक्षाने त्यांना पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले, अजूनही एकाच प्रकरणाची पुन्हा पुन्हा चौकशी लावून त्यांची छळवणूक सुरु आहे.

    आता पवार साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याची जबाबदारी नाथाभाऊंवर आहे. आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकित हे सिद्ध होईल. प्रसंगी कोणत्याही निवडणुका नसताना रोहिणीताईनी सुरु केलेल्या जनसंवाद यात्रेबद्दल अभिनंदन करून ही यात्रेची संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा आशावाद व्यक्त केला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोदवड तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केले.याआधी जिल्हायुवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र नाना पाटील, जि प सदस्य रामदास पाटील यांनी मनोगते व्यक्त केलीत.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब रवींद्र पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, माफदाचे अध्यक्ष विनोद भाऊ तराळ, महिला आघाडी अध्यक्षा वंदनाताई चौधरी, युवक अध्यक्ष रविंद्र नाना पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर भाऊ राहणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निवृत्तीभाऊ पाटील, VJNT सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील, जामनेर तालुका अध्यक्ष विलास भाऊ राजपूत, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यू डी पाटील सर, बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामदास भाऊ पाटील, शेलवड नगरीचे सरपंच समाधान भाऊ बोदडे, उपसरपंच रामदास भाऊ माळी, राजाराम भाऊ जवरे, रामभाऊ म्हस्के, अशोक सोन्नी, राजू पाटील, ईश्वर वाणी, कडू माळी , समाधान राऊत, वामन म्हस्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    नगर परिषद, नगर पंचायतीचा निकाल पडणार लांबणीवर !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.