Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आदिवासी भिल्ल सरकारी योजनेपासून वंचित ; गटविकास विभागाला निवेदन
    जळगाव

    आदिवासी भिल्ल सरकारी योजनेपासून वंचित ; गटविकास विभागाला निवेदन

    editor deskBy editor deskAugust 26, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    एकलव्य संघटनेच्या वतीने तसेच एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या आदेशानुसार आज जळगांव जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जळगाव तहसीलदार, जळगांव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना जळगाव जिल्हाध्यक्ष ( रावेर लोकसभा ) निवृत्ती पवार जळगांव तालुकाध्यक्ष राहूल ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

    निवेदनात म्हटले आहे की, जळगांव जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाज मोठ्या संख्येने स्वतंत्रपूर्वी काळापासून वास्तव्य करत असून आजही हा समाजात घरकुल, रेशनकार्ड, पासून वंचित आहे केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्व बेघर गोरगरीब कुटूंबांना घर देण्याचे ठरवले असून आजही मोठ्या संख्येने आदिवासी भिल्ल समाज हा ह्या योजना पासून दूर आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतला प्रधानमंत्री, शबरी, आवास योजना राबविण्यात येत आहेत परंतु ह्या योजनेचा लाभ सरपंच, ग्रामसेवक, आर्थिक भ्रष्टाचार करून गरजू लाभार्थ्यांना ( ड ) यादीतून वगळून जे आर्थिक परिस्थितीत भक्कम आहेत अश्या बोगस लाभार्थ्यांना लाभ येत असून ह्या प्रकरणात जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन व तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना देऊन नव्याने प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसेवक मार्फत नव्याने गरजू आदिवासी समाजाचे नावे ( ड ) यादी मध्ये समावेश करून घेण्यात यावे व आर्थिक भ्रष्टाचार करून आर्थिक परिस्थिती भक्कम असणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

    तसेच जळगांव तहसिल कार्यालयात नविन रेशनकार्ड साठी व ऑनलाईन (S.R.C) बारा अंकी नंबर साठी पुरवठा कार्यालयाचे 2, 3, महिने चक्कर वर चकरा मारूनही वेळेत काम पूर्ण होत नाही अश्या बेशिस्त अधिकारी कर्मचारी यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात यावी व नविन जुने रेशनकार्ड, वर (S.R.C) बारा अंकी नंबर तात्काळ टाकून देऊन ते रेशनकार्ड चालू करून त्यावर वंचित लाभार्थ्यांना धान्य देण्यात यावे अन्यथा एकलव्य संघटना जिल्ह्यातील आंदोलने करेल असे निवेदन देण्यात आले ह्यावेळी निवेदन देतांना जळगांव जिल्हाध्यक्ष ( रावेर लोकसभा ) निवृत्ती पवार जळगांव तालुकाध्यक्ष राहुल ठाकरे तालुका सोशल मिडिया प्रमुख सुनिल सोनवणे, दिपक सोनवणे, धनराज पवार श्री. लहू अहिरे, रविंद्र मोरे , रामचंद्र मोरे, हिलाल बोरसे, मनीलाल सोनवणे, राहुल गायकवाड, रविंद्र सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे,अजय मोरे, समाधान मोरे, जितेंद्र मोरे, सीताराम मोरे, योगेश सोनवणे, विजय पवार, महेंद्र मोरे, अजय पवार, आनंद मोरे आदिसह समाज बांधव उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.