Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की
    क्राईम

    महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

    editor deskBy editor deskAugust 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    वीज बिल थकीत झाल्यानंतर कनेक्शन कट केल्याच्या रागातून महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप संजय चौधरी (वय २६, रा. मोरेवाडा डांगपुरा यावल) असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

    या संदर्भात महेद्र सीताराम कुरकुरे (वय ३०, धंदा : महावितरण कार्यालय यावल रा.न्हावी ता.यावल) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, विजबिल बाकी असल्याने प्रदीप चौधरी हे राहत असलेल्या भाड्याच्या घराचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. याचाच राग येऊन दि.२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रदिप चौधरी याने महावितरण कार्यालयात येऊन वरीष्टांनी दिलेल्या विजबीलाची वसुली करण्याचे तसेच थकीत विज बिल ग्राहकांचे विज कनेक्शन कट करण्याचे शासकीय कामापासून महेद्र कुरकुरे यांना धाकाने परावृत्त करण्यासाठी धक्का-बुक्की करुन शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रदीप चौधरी विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरीक्षक सुनिता कोळपकर ह्या करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.