Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात वीज पडून २ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू
    जळगाव

    जळगावात वीज पडून २ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्यात पावसाचा जोर वाढणार असून आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील निमकराळ येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २० ऑगस्स्ट रोजी घडली. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विजांच्या गडगडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

    जळगाव येथील निमकराळ भागातील आडोळ, मांडवा, तिवडी, गीलखेड, दादुलगाव या परिसरात शनिवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सध्या शेतातील कामे सुरू असल्याने निमकराळ येथील अमोल रघुनाथ पिसे (वय २२ वर्ष ) मधुकर तुळशीराम उगले (वय ५६ वर्ष) आणि त्यांच्या पत्नी यमुना मधूकर उगले (वय ४८ वर्षे) तीघेही शेतात काम करत होते. जोरदार पाऊस आणि विजांच्या कउकडाटा झाल्याने तिघेही शेतातील झाडाखाली उभे होते. त्या झाडावर विज पडली झाडाखाली असलेल्या अमोल पिसे आणि मधूकर उगले या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर यमुना उगले या गंभीर जखमी झाल्या आहेत.

    #jalgov #accident #rainupdates #topnews
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.