Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
    क्राईम

    जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 25, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी ;– जिल्हा पोलीस प्रशासनाने अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून यात निरिक्षक आणि सहायक पोलीस निरिक्षक दर्जाच्या २६ अधिकार्‍यांचा समावेश आहे. यातील बहुतांश अधिकारी जिल्ह्यातील असून काही बाहेरून जिल्ह्यात आले आहेत.

    जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांच्या काही दिवसांपूर्वीच बदल्या झाल्या होत्या. यानंतर आता पोलीस निरिक्षक आणि सहायक पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात खालील प्रमाणे बदल्या करण्यात आल्या आहेत.

    शनिपेठचे प्रभारी असणारे निरिक्षक विठ्ठल ससे यांची पोलीस निरिक्षक सुरक्षा शाखा प्रभारी येथे बदली झाली आहे.भुसावळ शहरचे निरिक्षक बाळासाहेब बाजीराव ठोंबे यांची जिविशा शाखा जळगाव प्रभारी येथे बदली करण्यात आली आहे.भुसावळ तालुका पोलीस स्थानकातील रामकृष्ण महादू कुंभार यांची जळगाव तालुका स्थानकात प्रभारी निरिक्षकपदी बदली झाली आहे. रावेर पोलीस स्थानकाचे रामदास वाकोडे यांची जिल्हापेठ पोलीस स्थानकात निरिक्षकपदी बदली झाली आहे.चाळीसगावचे प्रभारी विजयकुमार नरसिंहराव ठाकूरवाड यांची जळगाव शहर पोलीस स्थानकात बदली झाली आहे.

    जामनेरचे प्रताप विश्‍वनाथ इंगळे यांची भुसावळ शहर पोलीस स्थानकात निरिक्षकपदी ट्रान्सफर झाली आहे. शहर वाहतूक शाखेचे देविदास मधुकर कुनगर यांची चोपडा ग्रामीण येथे बदली झाली आहे.पोलीस नियंत्रण कक्षातील किरण बाजीराव शिंदे यांची जामनेर स्थानकात बदली झाली आहे.बुलढाणा येथील कैलास नागरे यांची रावेर पोलीस स्थानकात बदली झाली आहे.बीडीडीएस नाशिक शहर येथील विजय फकीरराव शिंदे यांची रामानंदनगरला बदली झाली आहे. वाशीम येथील शंकर विठ्ठल शेळके यांची धरणगाव पोलीस स्थानकात बदली झाली आहे.

    नाशिक ग्रामीण येथील कांतीलाल काशिनाथ पाटील यांची चाळीसगाव शहरला बदली झाली आहे. धरणगाव येथील अंबादास शांताराम मोरे यांची जळगाव येथील मानव संसाधन शाखेत बदली झाली. जिल्हापेठचे विलास वसंत शेंडे यांच्याकडे आता भुसावळ तालुक्याचा प्रभार असणार आहे.सुरक्षा शाखेतील दिलीपसिंह मांगो पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. नियंत्रण कक्षातील लिलाधर नारायण कानडे यांच्याकडे आता जळगाव शहर वाहतूक शाखेची जबाबदारी आली आहे.सायबर पोलीस स्थानकाचे बळीराम हिरे यांची शनिपेठला बदली झालेली आहे.

    संतोष नारायण भंडारे यांच्याकडे आता पारोळा स्थानकाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे.मानव संसाधन विभागातील अरूण काशिनाथ धडवडे यांच्याकडे पहूर स्थानकाची जबाबदारी आली आहे.भुसावळ बाजारपेठचे सपोनि अनिल छबू मोरे यांच्याकडे नशिराबादची जबाबदारी आली आहे. एलसीबीचे सपोनि सिध्देश्‍वर हेमंत आखेगावकर यांच्याकडे फैजपूर स्थानकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे पिंपळगाव हरेश्‍वरच्या सपोनि निता कायटे यांच्याकडे कासोदा पोलीस स्थानकाची जबाबदारी आली आहे.बाजारपेठचे सपोनि कृष्णा भोये यांना पिंपळगाव हरेश्‍वरची जबाबदारी मिळाली आहे.

    एमआयडीसीतील सपोनि जयेश खलाणे यांना मारवड स्थानकाची जबाबदारी मिळाली आहे.पहूरचे सपोनि स्वप्नील नाईक यांच्याकडे भुसावळ शहर वाहतूक शाखेची जबाबदारी असेल. नाशिक येथून येणारे आशिषकुमार आडसूळ यांच्याकडे वरणगावची जबाबदारी मिळाली आहे.

     

     

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ५० हजार नागरिकांच्या सुरक्षेसाठी कालिका माता परिसरात स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

    February 14, 2026

    अमळनेरमध्ये राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई; बनावट मद्य कारखान्याचा पर्दाफाश, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    February 14, 2026

    आमदाराच्या संपर्क कार्यालयात संशयास्पद बॅग; पोलिसांनी ताब्यात घेतले एअरगन

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.