Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मी मंत्री होऊ नये म्हणून काही जणांनी देवाजवळ नारळ बुडून ठेवले; ना. गुलाबराव पाटील
    जळगाव

    मी मंत्री होऊ नये म्हणून काही जणांनी देवाजवळ नारळ बुडून ठेवले; ना. गुलाबराव पाटील

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    माझा तिसरा डोळा उघडला तर…

    गौरव पाटील प्रतिनिधी : राज्यात सत्ता संघर्षानंतर शिंदे सरकारने कॅबिनेट मंत्री मंडळाचा विस्तार केला व त्यामध्ये खान्देशची मुलुख मैदान तोफ आ.गुलाबराव पाटील यांचा ही कॅबिनेट मंत्रीपदी निवड करून खान्देशला मंत्री मंडळात सामील केले. त्यानंतर ना.पाटील हे प्रथमच मंत्री झाल्यावर जिल्हात जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले.

    यावेळी ना.पाटील बोलतांना म्हणाले की, मी मंत्री होऊ नये म्हणून थेट गल्लीतून दिल्लीपर्यंत तक्रार केली. काही जणांनी देवाजवळ नारळ बुडून ठेवले होते. पण मी तिसऱ्यांदा मंत्री झालो. मिरवणुकीत हजार गाड्या होत्या, पैसा कितीही असला तरी बाजारात माणूस विकत घेता येत नाही, 35 वर्षांची माझी ही तपश्चर्या आहे. माझ्याकडे जातीचे भांडवल नाही, माझी जात तुम्हीच आहात. बरेच दिवस माझ्यावर बऱ्याच टीका केल्या, पण मी गप्प होतो. वरपर्यंत निरोप गेले मंत्री करू नका म्हणून, तक्रार करणारे जळगावातील होते. परंतु, मी जर माझा तिसरा डोळा उघडला तर काय करू शकतो हे त्यांना माहीत नाही, असा इशारा शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी दिला.

    मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच आमदार गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. जिल्हावासियांनी यावेळी त्यांचं जंगी स्वागत केलं. अमळनेर तालुक्यातील कोंढवाय फाट्यावर फटाके फोडून गुलाबराव पाटील यांचं जल्लोष स्वागत करण्यात आलं. भर पावसात देखील शेकडो कार्यकर्ते गुलबाराव पाटील यांच्या मिरवणूक रॅलीत सहभागी झाले होते. गुलाबराव पाटील यांच्या या मिरवणुकीत जवळपास तीनशे कार सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीनंतर पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

    “आजची रॅली बघितल्यानंतर मला थकवा आला नाही. ज्या गावात मी गुलाबचा गुलाबराव झालो त्या गावात मला यावेच लागले. धरणगावात गुलाबराव काही नाही असे काही जण म्हणायचे. पण आज त्यांनी बघितले, माझ्याविरोधात कोण षडयंत्र रचते ते मला माहित आहे, पण मी लक्ष देत नाही. येत्या एक दोन दिवसात खातेवाटपात होईल. कोणतेही खाते आले तरी काम करण्याची धमक पाहिजे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    २४२ बक्षिसांची कमाई; राष्ट्रपती सन्मानाने गौरवले संजय शेलार

    January 25, 2026

    गावकुसाबाहेर डिजिटल पाऊल; पंचायतींसाठी ‘पंचम’ चॅटबॉट लाँच

    January 25, 2026

    पद्मश्री जाहीर: महाराष्ट्राच्या भूमीतील कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान

    January 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.