

जळगाव : प्रतिनिधी
किरकोळ कामासह मुलीला भेटण्यासाठी जळगावला येत असताना दुचाकीचा अपघात होऊन कडू तापीराम पाटील (वय ५२, रा. सोनाळा, ता. जामनेर) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही अपघाताची घटना दि. २३ नोव्हेंबर रोजी चिंचोली गावाजळ घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील शेतकरी असलेले कडू पाटील हे कामानिमित्त व सोबत मुलीची भेट घेण्याचे ठरवून दुचाकीने जळगावला येत होते. त्या वेळी त्यांचा चिंचोलीजवळ अपघात झाला. ते रस्त्यावर पडलेले असल्याने काही जणांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.



