Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिच्यासोबत पाहिली आयुष्याची स्वप्ने, तिचाच घेतला जीव : रात्रभर मृतदेहाशेजारी बसला प्रियकर
    क्राईम

    जिच्यासोबत पाहिली आयुष्याची स्वप्ने, तिचाच घेतला जीव : रात्रभर मृतदेहाशेजारी बसला प्रियकर

    editor deskBy editor deskNovember 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    हिंजवडी आयटी पार्क परिसरात प्रेमसंबंधातील वादातून आयटी इंजिनिअरने प्रेयसीचा मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. कोमल राजेंद्र डहाके (२७, मूळ रा. वर्धा) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर शुभम ज्ञानेश्वर काळबांडेला हिंजवडी पोलिसांनी अटक केली.

    कोमल व शुभम संगणक अभियंते असून कोमल विप्रो कंपनीत, तर शुभम इन्फोसिस कंपनीत नोकरीला होता. दोघांचे गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शुभमचे दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद होत होते. रविवारी रात्री दोघे एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते हिंजवडीतील साखरे वस्ती येथील कोमल राहत असलेल्या पीजी निवासस्थानी परतले. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

    कोमल निपचित पडल्यानंतरही आरोपी रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून होता. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने हिंजवडी पोलिसांना फोन करून रुग्णवाहिकेची मदत मागितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता मारहाणीचा प्रकार उघडकीस आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर काळाचा घाला : कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांची अचानक एक्झिट

    November 24, 2026

    सोने-चांदीचे भाव पुन्हा भडकले : आठवडाभराच्या घसरणीनंतर बाजारात मोठी उसळी

    November 24, 2026

    जेठाणीसोबतच्या संबंधांचा विरोध केला अन् पत्नीचा काटा काढला; पतीला जन्मठेप

    November 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.