Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कार्तिकी एकादशीला विठुरायाची महापूजा : एकनाथ शिंदेंनी बळीराजासाठी घातले साकडे
    क्राईम

    कार्तिकी एकादशीला विठुरायाची महापूजा : एकनाथ शिंदेंनी बळीराजासाठी घातले साकडे

    editor deskBy editor deskNovember 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पंढरपूर : वृत्तसंस्था

    कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वावर आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. या महापूजेत वारकरी प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याचा बहुमान नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याला मिळाला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, ‘बळीराजावरील संकट आणि दुष्काळाचे सावट दूर करून त्याला ताकद दे,’ असे साकडे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी विठुरायाचरणी घातले.

    महापूजेनंतर भावना व्यक्त करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुख्यमंत्री असतानाही मी एक वारकरी म्हणूनच इथे आलो होतो आणि आज उपमुख्यमंत्री असतानाही वारकरी म्हणूनच पांडुरंगाच्या दर्शनाला आलो आहे.” यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलगा देखील उपस्थित होते. यंदाच्या शासकीय महापूजेचा मान नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील शेतकरी सुधाकर दशरथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांना मिळाला. महापूजेनंतर सुधाकर शिंदे यांनी अत्यंत भावुक प्रतिक्रिया दिली. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मिळावी, अशी माझी मनापासून इच्छा होती. आज स्वतः पांडुरंगाने माझी ती इच्छा पूर्ण केली,” असे ते म्हणाले.

    शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पंढरपूर ते घुमान’ (पंजाब) या सायकलवारीला हिरवा झेंडा दाखवला. पांडुरंगाच्या आशीर्वादाची प्रेरणा घेऊन अनेक तरुण आणि ज्येष्ठ सायकलपटू पंजाबमधील घुमानकडे रवाना झाले आहेत. या सर्व सायकलपटूंना उपमुख्यमंत्र्यांनी प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

    कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली असली, तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या काहीशी कमी आहे. गेल्या वर्षी ४ लाखांहून अधिक भाविक आणि १४३ दिंड्या पंढरीत दाखल झाल्या होत्या. मात्र, यंदा मराठवाडा आणि विदर्भातून येणाऱ्या भाविकांची संख्या कमी राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा भाविकांच्या संख्येत सुमारे १ लाखाने घट होऊन ३ लाखांवर भाविक आणि १२० दिंड्या पंढरीत दाखल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावरील खड्डा ठरतोय जीवघेणा : नारळाचा ट्रक उलटला; नागरिकांचा प्रशासनावर संताप

    November 21, 2026

    शेतीच्या कामासाठी निघाला… पण वाटेतच काळाने गाठले! १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    November 21, 2026

    १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट! गोंदे गावातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा मोठा प्रहार

    November 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.