

जळगाव : प्रतिनिधी
घर भाड्यासाठी व मुलीच्या क्लाससाठी पैसे आणि सोन्याचे दागिने मागण्याकरीता गेलेल्या रुपाली भावेश गांधी (वय ३३, रा. भिकमचंद जैन नगर) या महिलेला तिच्या जेठाने घरातून ढकलून बाहेर काढले. यावेळी विवाहिता पायऱ्यांवर पडल्यामुळे तिच्या कपाळाला जखम झाली असून पायाला सूज आली आहे. ही घटना दि. १७ रोजी दुपारच्या सुमारास शहरातील रत्ना अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी अमित जयकर गांधी (रा. नेहरु चौक) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज बैंक बंद आहे त्यामुळे मी तुला पैसे देवू शकत नाही. तसेच तुझे कोणतेही दागिने आमच्याकडे नाही तुला जे करायचे ते कर आमचे काही होणार नाही. असे बोलत असतांना विवाहितेचे जेठ अमित गांधी हे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी तुझे कोणतेच दागिने आमच्याकडे नाही व असले तरी तुला मिळणार नाही असे म्हणत त्यांनी विवाहितेला ढकलत घराबाहेर काढले. ढकलून दिल्यामुळे पायऱ्यांवरुन पडून जखमी झाल्या.



