Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे : एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचा मृत्यू !
    क्राईम

    डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे : एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचा मृत्यू !

    editor deskBy editor deskNovember 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याचा वसतिगृहात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावात उघडकीस आली. रुशान अफराज सैयद (वय २०, मूळ रा. टाकळी बुद्रुक, जि. अमरावती) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    रुशान हा डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, जळगाव खुर्द येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या वसतिगृहात तो राहत होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी रात्री रुशानला उलटी झाली होती. प्रकृती ठीक नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला येणार नसल्याचे त्याने मित्रांना सांगितले. सकाळी मित्र कॉलेजला निघून गेले असताना रुशान वसतिगृहात झोपलेला होता.

    कॉलेजमधून परतल्यानंतर मित्रांनी रुशानला बेशुद्धावस्थेत पाहिले. त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    या घटनेची नोंद नशिराबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, विद्यार्थ्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या मित्रपरिवारासह महाविद्यालयात शोककळा पसरली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २८ वर्षीय बाळू पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; बाळद परिसरात हळहळ

    November 19, 2026

    रत्ना अपार्टमेंटमध्ये कौटुंबिक वादाचा भडका : विवाहितेला ढकलून घराबाहेर काढले; जेठाविरुद्ध गुन्हा

    November 19, 2026

    मृत महिलांच्या नावाने बनावट कागदपत्रे? मेहरुणमधील जमीन हडप प्रकरणी ६ जणांवर गुन्हा!

    November 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.