Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मृत महिलांच्या नावाने बनावट कागदपत्रे? मेहरुणमधील जमीन हडप प्रकरणी ६ जणांवर गुन्हा!
    क्राईम

    मृत महिलांच्या नावाने बनावट कागदपत्रे? मेहरुणमधील जमीन हडप प्रकरणी ६ जणांवर गुन्हा!

    editor deskBy editor deskNovember 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    एकच नाव असलेल्या महिलांच्या मदतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे आणि बनावट दस्त तयार करून मेहरुण शिवारातील २९०.३१ जमीन हडपली. ही घटना दि. २७ ऑगस्ट २०२४ ते दि. १८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नाशिक व धुळे जिल्ह्यातील खरेदीदार, साक्षीदारांसह ६ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील गांधी नगरात राहणारे विलास श्यामराव कुमावत (वय ६१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहरुण शिवारातील सव्हें क्रमांक १६ पैकी भूखंड क्रमांक १ मधील २९०. ३१ चौरस मीटर ही जागा त्यांची आई धुपदाबाई श्यामराव मित्री (कुमावत) व आत्या सुंदराबाई तानाजी मिस्त्री (कुमावत) यांच्या मालकिची होती. नंतर आत्याने ती धुपदाबाई यांच्या नावावर करून दिली. त्यानंतर कोरोना काळात धुपदाबाई यांचेही निधन झाले. मात्र जमिनीच्या सातबाऱ्यावर वारसांचे नाव लावले गेलेले नव्हते. असे असताना सदर जागा विजया नरेश क्षत्रीय यांच्या मालकिची असल्याची जाहीर नोटीस वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली. त्या वेळी हा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात आला. त्यांनी या विषयी खरेदीसाठी वापरलेल्या कागदपत्रांची प्रत मिळविली असता ते सर्व बनावट असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला.

    न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले व या प्रकरणी विलास कुमावत यांनी दि. १८ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नाव साधर्म्य असलेल्या सुंदराबाई तानाजी मिस्त्री, धुपदाबाई श्यामराव मित्री (दोन्ही रा. सावरकर नगर, नाशिक), खरेदीदार विजया नरेश क्षत्रीय (रा. धुळे), प्रमोद निरंजन भट्टा (रा. सिडको, नाशिक), सफुद्दीन तहेभाई बोहरा (रा. धुळे), मिलिंद एकनाथ निकम (रा. साक्री, जि. धुळे) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार दीपक शिरसाठ करत आहेत.fir

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २८ वर्षीय बाळू पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; बाळद परिसरात हळहळ

    November 19, 2026

    रत्ना अपार्टमेंटमध्ये कौटुंबिक वादाचा भडका : विवाहितेला ढकलून घराबाहेर काढले; जेठाविरुद्ध गुन्हा

    November 19, 2026

    डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे : एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचा मृत्यू !

    November 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.