Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिवाजी नगरातून तरूणाच्या मोटारसायकलची चोरी
    क्राईम

    शिवाजी नगरातून तरूणाच्या मोटारसायकलची चोरी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव-प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर भागातील रेल्वे स्टेशनजवळून तरूणाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश दिलीप खर्चाने (वय-३०) रा. हरिओम नगर, जुना आसोदा रोड, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. इलेक्ट्रिकशीअनेचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तो शिवाजीनगर भागाकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका वॉल कंपाऊंडजवळ दुचाकी (एमएच १५ एएफ ७६८१) ने आला होता. त्यावेळी त्याने कंपाऊंडच्या शेजारी असलेल्या दत्त मंदिराजवळ दुचाकी पार्किंगला लावून कामानिमित्त निघून गेला. त्यानंतर काम आटोपून घरी परत आला असता त्याला जागेवर दुचाकी मिळून आली नाही. दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली असता दुचाकी मिळून आली नाही. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.