Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुन्या दुचाकीच्या व्यवहारातून तरुणाचा निर्घृण खून : बीड जिल्ह्यात घडली घटना !
    क्राईम

    जुन्या दुचाकीच्या व्यवहारातून तरुणाचा निर्घृण खून : बीड जिल्ह्यात घडली घटना !

    editor deskBy editor deskNovember 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    जुनी दुचाकी खरेदीसाठी नांदगाव (ता. वाशी, जि. धाराशिव) येथून बीडच्या वानगाव येथे आलेल्या २ तरुणांना चोरी केल्याचा आरोप करत ट्रॅक्टरला बांधून पाइपाने मारहाण केली. यात संभाजी विश्वनाथ सारुक (३८) यांचा मृत्यू झाला, तर हर्ष विकास जाधवर हा तरुण जखमी झाला. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध नेकनूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली.

    हे दोघे रविवारी दुपारी मुकादम अशोक कागदे याची जुनी दुचाकी खरेदीसाठी वानगावला आले होते. दुचाकी पाहण्यासाठी अशोकने दोघांना घरी पाठवले. तिथे पवन रोमण व अन्य आरोपींनी संभाजी व हर्षवर ५० हजार रुपये व मोबाइल चोरीचा आरोप करत मारहाण केली. संभाजीला पाइपाच्या साहाय्याने ट्रॅक्टरच्या नांगराला, तर हर्षला ट्रॅक्टरच्या बारपट्टीला बांधून पाचही जणांनी बेदम मारहाण केली. यानंतर आरोपींनी पळ काढला.

    संभाजी बेशुद्ध झाल्यानंतर संशयित निघून गेले. हर्षने संभाजीच्या मोबाइलवरून आई अनिताला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. एक तासानंतर हर्षचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांची सुटका करून त्यांना तेरखेडा (जि. धाराशिव) येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर येरमाळा पोलिसांनी सोमवारी पहाटे नेकनूर पोलिसांना ही माहिती दिली. मृत संभाजी सारुक

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    साखरपुड्याचा सोहळा ठरला अखेरचा प्रवास : विटनेरजवळ भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू!

    November 17, 2026

    ३५ टक्के पैसे भरा, शिलाई मशीन मिळवा : आमिषाला बळी पडल्या ९० महिला !

    November 17, 2026

    शेतकऱ्यांच्या मुलांची थट्टा थांबवा! सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? रोहिणी खडसे आक्रमक !

    November 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.