Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साखरपुड्याचा सोहळा ठरला अखेरचा प्रवास : विटनेरजवळ भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू!
    क्राईम

    साखरपुड्याचा सोहळा ठरला अखेरचा प्रवास : विटनेरजवळ भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू!

    editor deskBy editor deskNovember 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    सिल्लोड येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या भीषण अपघातात मामाचा जागीच मृत्यू झाला, तर भाचा जखमी झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी विटनेर (ता. जळगाव) जवळ घडली. दुचाकीवरून खाली पडलेल्या अनिल नागो सपकाळे (वय ४३, रा. दापोरा) यांच्या पायावरून मागून येणारा ट्रक गेल्याने त्यांचा अंत झाला.

    अनिल सपकाळे हे १५ नोव्हेंबर रोजी जळगाव तालुक्यातील विटनेर गावाजवळून दापोरा येथे जात असताना हा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी तत्काळ जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून अनिल सपकाळे यांना मृत घोषित केले. दरम्यान या अपघातात मृत अनिल यांचा भाचा जानकीराम किसन सोनवणे हादेखील किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, तपासणी अंमलदार पोलिस नाईक पंकज पाटील हे करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जुन्या दुचाकीच्या व्यवहारातून तरुणाचा निर्घृण खून : बीड जिल्ह्यात घडली घटना !

    November 17, 2026

    ३५ टक्के पैसे भरा, शिलाई मशीन मिळवा : आमिषाला बळी पडल्या ९० महिला !

    November 17, 2026

    शेतकऱ्यांच्या मुलांची थट्टा थांबवा! सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? रोहिणी खडसे आक्रमक !

    November 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.