Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ३५ टक्के पैसे भरा, शिलाई मशीन मिळवा : आमिषाला बळी पडल्या ९० महिला !
    क्राईम

    ३५ टक्के पैसे भरा, शिलाई मशीन मिळवा : आमिषाला बळी पडल्या ९० महिला !

    editor deskBy editor deskNovember 17, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    ३५ टक्के रक्कम भरून शिलाई मशीन देण्याचे आमिष दाखवून ९० महिलांची ३ लाख १० हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सप्टेंबर २०२५ पासून सुरू होता. या प्रकरणी सपना संजय कोळी व संजय कोळी (सोनवणे) (दोघे रा. देवकर नगर) या दोघांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भादली गावामध्ये ३५ टक्के रक्कम भरून फुल शटल मोटारसहित शिलाई मशिन मिळेल, असे पॅम्पलेट लावण्यात आले होते. त्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी सप्टेंबर २०२५ मध्ये सपना कोळी व संजय कोळी हे दोघे जण भादली गावात गेले व योजनेची माहिती दिली. गावातील माधुरी भागवत मिस्तरी (५०) यांना शिलाई मशिन मिळाली असल्याने दोघांनी त्यांना भेटून ‘तुम्हाला ज्या पद्धतीने मशिन मिळाली, त्याप्रमाणे तुमच्या ओळखीतील महिलांकडून पैसे व अर्ज जमा करून द्या, पैसे मिळाल्यानंतर इतर महिलांनाही मशिन देऊ’, असे सांगितले. त्यानुसार माधुरी मिस्तरी यांनी ओलखीतील व नात्यातील एकण ९० महिलांना माहिती दिली. त्यानंतर सपना कोळी व संजय कोळी यांना ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण ३ लाख १० हजार रुपये दिले. मात्र, कोणालाही मशिन मिळालीच नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी आहे

    पैसे जमा झाल्यानंतर साडेतीन महिन्यांत मशिन देण्याचे सांगण्यात आले होते, मात्र मुदत संपूनही मशिन मिळाल्या नाहीत. त्यामुळे माधुरी मिस्तरी यांनी कोळी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. वारंवार पाठपुरावा केल्याने दोघांनी सदर महिलेला शिवीगाळ करत धमकी दिली. मशिन तर मिळाल्याच नाहीत, पैसेही परत मिळत नसल्याने माधुरी मिस्तरी यांनी १५ नोव्हेंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सपना कोळी व संजय कोळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रिया दातीर करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जुन्या दुचाकीच्या व्यवहारातून तरुणाचा निर्घृण खून : बीड जिल्ह्यात घडली घटना !

    November 17, 2026

    साखरपुड्याचा सोहळा ठरला अखेरचा प्रवास : विटनेरजवळ भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू!

    November 17, 2026

    शेतकऱ्यांच्या मुलांची थट्टा थांबवा! सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? रोहिणी खडसे आक्रमक !

    November 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.