Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघांवर चाकू हल्लाएमआयडीसी पोलीसात अज्ञात पाच जणांवर गुन्हा दाखल
    क्राईम

    वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघांवर चाकू हल्ला
    एमआयडीसी पोलीसात अज्ञात पाच जणांवर गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 10, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । वाद मिटवित असतांना अज्ञात पाच जणांनी येऊन चाकू हल्ला करून दोन जणांना जखमी केल्याची घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सुशील मनोज जाधव (वय-२०) रा. सुधाकर नगर, एमआयडीसी हा आपला मित्र राकेश गोपाल पाटील यांच्यासोबत मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी कॉलेज चौकावरील माऊली साई टी सेंटर येथे उभे होते. त्यावेळी कालिंका माता मंदिराकडून भरधाव वेगाने दुचाकीवर अनोळखी तीन येत होते. तर चहाच्या टपरीजवळून एक सायकलस्वार जात होता. दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने सायकलस्वराला धडक दिली. यामध्ये सायकलस्वराच्या सायकलचे नुकसान झाले. यावरून त्यामध्ये वाद निर्माण झाला. सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी राकेश पाटील, सुशील जाधव आणि बाजूला उभा असलेला बेकरीवाला सुरेश पाटील यांनी मध्यस्थी केली असतांना यातील अनोळखी व्यक्तीने त्याच्या हातातील धारदार चाकू काढून राकेश पाटील यांच्या पोटावर तर बेकरीवाला सुमित पाटील यांच्या पाठीवर मारहाण करून दुखापत केली. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी धाव घेऊन माहिती घेतली. जखमी झालेल्या राकेश गोपाळ पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत बुधवार १० ऑगस्ट रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.