Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महावितरणमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश : सहाय्यक अभियंत्यासह दोन तंत्रज्ञ ताब्यात!
    क्राईम

    महावितरणमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश : सहाय्यक अभियंत्यासह दोन तंत्रज्ञ ताब्यात!

    editor deskBy editor deskNovember 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    विद्युत मीटर तपासणीनंतर वीज उपकरणाचा भार अधिक असल्याने वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचे सहाय्यक अभियंता विशाल वसंत नेमाडे (३७, रा. योगेश्वर नगर) यांच्यासह दोन वरिष्ठ तंत्रज्ञांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवार दि.१४ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

    एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात तक्रारदाराच्या घरी महावितरणच्या महसूल व देय उपविभागाचे सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कडू तायडे (४५, रा. कोल्हे हिल्स परिसर), रवींद्र छन्नू पाटील (४१, रा. पंडित कॉर्नर अपार्टमेंट) हे वीज मीटर तपासणीसाठी गेले होते. तेथे बसविलेल्या नवीन वीज मीटरची तपासणी करून वीज मीटरचे व घरातील उपकरणाचे फोटो काढले. त्यानंतर भरत तायडे याने तक्रारदारास फोन करून बोलविले व तुमच्याकडे अधिक भार असल्याने वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी सहाय्यक अभियंत्याच्या नावाने ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच घेण्यास संमती दर्शविली. याविषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार केली. त्यानंतर सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांना १५ हजार रुपयांची लाज घेताना पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पिंप्राळा–निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

    November 22, 2026

    प्रेमीयुगुलावर अल्पवयीन टोळक्याचा अमानुष हल्ला; व्हिडिओ व्हायरल, ८ जण ताब्यात!

    November 22, 2026

    तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ९ जणांचा मृत्यू!

    November 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.