Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : अत्याचारातून महिलेने दिला बाळाला जन्म; नराधमास अटक
    क्राईम

    खळबळजनक : अत्याचारातून महिलेने दिला बाळाला जन्म; नराधमास अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 10, 2022Updated:August 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा प्रतिनिधी । महिलेवर झालेल्या अत्याचारातून तिने नवजात बालकाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला रात्री उशीरा चोपडा ग्रामीण पोलीसांनी अटक करण्यात केली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणारी ३६ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी काम करून आपला उदरनिर्वाह करते. गावातील कैलास गोकूळ पाटील याने नऊ महिन्यांपुर्वी पिडीत महिलेवर दारूच्या नशेत तिच्या घराच्या झोपडीत येवून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. या अत्याचारातून महिलेने पुरूष जातीच्या नवजात बालकाला जन्म दिला. दरम्यान, समाजात बदनामी होईल या भितीपोटी महिलेने नवजात बालकाला नाल्यात फेकून दिले. दरम्यान, चोपडा ग्रामीण पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले, पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नवजात बालकाला तातडीने चोपडा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पिडीत महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधम कैलास गोकुळ पाटील याला मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषिकेश हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पिंप्राळ्यात शोककळा : इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना योगेश वाघ यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

    October 28, 2026

    २१ वर्षीय सनीच्या खून प्रकरणात सहा जणांना पोलिस कोठडी; तपासाला वेग

    October 28, 2026

    यावलला जाताना काळाचा घाला; दुचाकीवरून पडलेल्या ६२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

    October 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.