Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री शिरसाटांच्या बंगल्यावर मद्यपींचा धिंगाणा : शिरसाटांचा पोलिस आयुक्तांवर संताप!
    जळगाव

    पालकमंत्री शिरसाटांच्या बंगल्यावर मद्यपींचा धिंगाणा : शिरसाटांचा पोलिस आयुक्तांवर संताप!

    editor deskBy editor deskNovember 13, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था 

    शिंदे गटाचे आमदार तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील बंगल्याबाहेर गुरुवारी (१२ नोव्हेंबर) रात्री ११ वाजेच्या सुमारास ३ मद्यपी तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. सातारा पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

    शिरसाट यांच्या बंगल्याच्या मागील बाजूस काही तरुण मद्यपान करत होते. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना हटकले असता, त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. अनेक ओएसडी माझ्या खिशात आहेत, अशी धमकी देत मद्यपींनी बंगल्याच्या दिशेने रिकाम्या बाटल्या भिरकावल्या. यानंतर सुरक्षारक्षक व मद्यपी यांच्यात झटापट होऊन एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

    शिवसेनेचे आमदार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर शिरसाट यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत थेट छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांवर आणि पोलिस प्रशासनावर भ्रष्टाचाराचे, वसुलीचे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा अत्यंत गंभीर आणि स्फोटक आरोप केला आहे.

    शहरात अशा अनेक घटना घडतायेत. दिवसाढवळ्या खून होत आहेत आणि सीपींना त्याचे गांभीर्य नाही. माझ्या घरावर हल्ला होतोय आणि पोलिस आयुक्तांचा फोन बंद आहे. एकही डीसीपी किंवा एसीपी उपलब्ध नव्हता. शेवटी रात्री बारा वाजता राज्याच्या डीजींना फोन करून माहिती दिली. पालकमंत्र्यांची ही अवस्था असेल, तर सर्वसामान्यांचे काय? मी मुख्यमंत्र्यांकडे पोलिस आयुक्तांची नक्कीच तक्रार करणार आहे.

    – संजय शिरसाट, पालकमंत्री

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवासाठी मनपा सज्ज : मिरवणूक मार्ग स्वच्छतेचे उपमहापौरांचे कडक निर्देश!

    November 13, 2026

    जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम : ॲड. नीलम शिर्के सामंत यांच्याकडून जैन उद्योग समूहाच्या उपक्रमाचे कौतुक

    November 13, 2026

    जिल्हा बँकेसाठी महायुतीचे २१ उमेदवार निश्चित; उमेदवारांची यादी लाईव्ह महाराष्ट्राच्या हाती!

    November 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.