Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वराड फाट्याजवळ रिक्षाचा भीषण अपघात : एकाचा मृत्यू; रिक्षाचालक घटनास्थळावरून फरार!
    क्राईम

    वराड फाट्याजवळ रिक्षाचा भीषण अपघात : एकाचा मृत्यू; रिक्षाचालक घटनास्थळावरून फरार!

    editor deskBy editor deskNovember 13, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव  : प्रतिनिधी 

    तालुक्यातील वराड फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रवासी रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात एक अनोळखी प्रवासी ठार असून अपघातानंतर रिक्षाचालक फरार झाला आहे.

    या अपघातातील मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान, वराड फाट्याजवळ रिक्षा (एमएच १९, एक्यू- ७३७०) उलटली. या दुर्दैवी अपघातात रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला गंभीर इजा झाली होती. अपघातानंतर रिक्षाचालकाने दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने उलटलेली रिक्षा उचलून पुन्हा उभी केली. त्यानंतर रिक्षा वराड बुद्रुक गावात आणून लावून रिक्षाचालक घटनास्थळावरून फसार झाला आहे. तर, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमी व्यक्तीला तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

    मात्र, तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्या अनोळखी व्यक्तीला मयत घोषीत केले. मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तर, रिक्षाचालक अपघातानंतर फरार झाल्याने या घटनेबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवासाठी मनपा सज्ज : मिरवणूक मार्ग स्वच्छतेचे उपमहापौरांचे कडक निर्देश!

    November 13, 2026

    जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम : ॲड. नीलम शिर्के सामंत यांच्याकडून जैन उद्योग समूहाच्या उपक्रमाचे कौतुक

    November 13, 2026

    ‘आमदार रोहित पवार म्हणजे बँडवाले’: राम शिंदेंची जोरदार टीका !

    November 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.