Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संपत्तीच्या वादातून रक्ताच्या नात्यालाच गोळ्या : मुलाचा वडील आणि सख्ख्या भावावर गोळीबार !
    क्राईम

    संपत्तीच्या वादातून रक्ताच्या नात्यालाच गोळ्या : मुलाचा वडील आणि सख्ख्या भावावर गोळीबार !

    editor deskBy editor deskNovember 12, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कल्याण  : वृत्तसंस्था

    संपत्तीच्या वादातून कौटुंबिक नात्यांमधील संघर्ष किती टोकाला जाऊ शकतो, याचा धक्कादायक प्रकार कल्याण तालुक्यातील गुरवली पाडा परिसरात उघडकीस आला आहे. मालमत्तेच्या वादातून एका मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांसह सख्ख्या भावावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात बाळाराम शेलार आणि त्यांचा मुलगा भरत शेलार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी गोळीबार केल्याचा आरोप असलेला कल्पेश शेलार आणि त्याची पत्नी रसिका शेलार या दोघांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर दोघांनाही कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी दाम्पत्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील गुरवली पाडा येथे शेलार कुटुंबात मालमत्तेवरून वाद सुरू होता. याच वादातून मंगळवारी रात्री कुटुंबातील वातावरण तापले. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कल्पेश शेलार याने स्वतःचे वडील बाळाराम शेलार आणि सख्खा भाऊ भरत शेलार यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. संपत्तीच्या वादातून मुलानेच वडिलांसह भावावर गोळ्या झाडल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली.

    घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणात कल्पेश शेलार आणि त्याची पत्नी रसिका शेलार यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांनाही कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तपासासाठी आरोपी दाम्पत्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गोळीबारामागील नेमके कारण, मालमत्तेचा वाद किती जुना होता, तसेच हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र आरोपीने कुठून मिळवले, याचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच या घटनेत रसिका शेलार यांची नेमकी भूमिका काय होती आणि गोळीबार पूर्वनियोजित होता का, याचाही तपास सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणी हत्येचा प्रयत्न आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून जन्मदात्या वडिलांसह सख्ख्या भावावर गोळीबार झाल्याच्या या घटनेने नात्यांमधील वाढत्या संघर्षाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवारांच्या घातपाताच्या संशयावरून राजकीय वाद पेटला : गृहराज्यमंत्री कदमांच्या राजीनाम्याची आ.अनिल पाटलांची मागणी 

    November 12, 2026

    इन्स्टाग्राम रीलचा नाद जीवावर बेतला : हातातच फुटला स्काय शॉट; तरुणाच्या हाताला तब्बल ७२ टाके!

    November 12, 2026

    खाकी वर्दीपलीकडची माणुसकी : पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित चिमुकल्यांची आनंदाची दिवाळी !

    November 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.