Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांची आपसात हाणामारी !
    क्राईम

    जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांची आपसात हाणामारी !

    editor deskBy editor deskNovember 9, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये आपसात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. जेवणात भाजी मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका बंदीवानाला चौघा जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृह वर्ग-२ मध्ये ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेसात ते पावणेआठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी आकाश भानुदास गोरखा (वय २९, रा. रेल्वे बिल्डिंग, कष्टाडे नगर, भुसावळ, जि. जळगाव) हे कारागृहात बंदीवान असून, ते स्वतः या प्रकरणातील फिर्यादी आहेत.

    घटना घडली त्या दिवशी फिर्यादीने न्यायाधीन बंदी हर्षल नाना गुरव याच्याकडे भाजी मागितली होती. याच कारणाचा राग मनात धरून आरोपी हर्षल याने फिर्यादीला काहीही कारण नसताना कानशिलात लगावली. तसेच इतर आरोपींनी संगनमताने फिर्यादीची मान पकडून त्यांना जमिनीवर खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी व बेदम मारहाण केल्यामुळे फिर्यादीच्या ओठास सूज येऊन दात पाडल्याची व मुका मार लागल्याची तक्रार देण्यात आली आहे.

    या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात हर्षल नाना गुरव (वय २४, रा. पिळोदा, ता. अमळनेर), बिरेद्रसिंग उर्फ विक्की गोविंदसिंग तोमर (वय ३६, रा. टाकळी, ता. चाळीसगाव), सागर रमेश कोळी (वय ३०, रा. साकेगाव, ता. भुसावळ), धनंजय उर्फ धिरज दत्तू कोळी (वय २२, रा. पाळधी, ता.धरणगाव) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि गोपाळ देशमुख (नेमणूक, जिल्हा पेठ पोलीस ठाणे) करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रुग्णवाहिका लावण्यावरून वाद पेटला : तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; हाताला गंभीर दुखापत!

    November 10, 2026

    सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

    November 10, 2026

    फुलगाव गोळीबार प्रकरणाला हत्येचे वळण : आठ दिवसांच्या उपचारानंतर सरफराजची प्राणज्योत मालवली!

    November 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.