

जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्यासह सुलेमान अरमान तडवी (वय ३४, रा. किनगाव, ता. यावल) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अजिंठा चौफुली जवळील इदगाह कॉम्पलेक्स परिसरातून तरबेज सैय्यद आसिफ यांची (एमएच १९, टी ७७७०) क्रमांकाची दुचाकी दि. १ नोव्हेंबर रोजी चोरीस गेली होती. तर दुसरी कुसंबा येथील कैलास पाटील यांची (एमएच १९, डीएस ५१४०) क्रमांकाची दुचाकी दि. २५ ऑक्टोंबर रोजी चोरीस गेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, गजानन महाजन, विशाल कोळी, सुभाष साबळे, ललित नारखेडे व एलसीबीचे विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, रविंद्र पाटील, रावसाहेब पाटील यांचे पथक रवाना केले.
या पथकाने तपासचक्रे फिरवित संशयित सुलेमान तडवी यासह अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत त्यांच्याकडून चोरलेल्या दोन्ही दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.



