

जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील जळके येथील सौ.मिराबाई अर्जुन पाटील यांचे वयाच्या ६४ वर्षी आज सकाळी ९:३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्या जळगाव शेतकी संघ माजी चेअरमन तथा लाडकी बहिण योजना जळगाव तालुका अध्यक्ष अर्जुन गजमल पाटील यांच्या धर्म पत्नी तसेच जळगाव तालुका स्टॅम्प वेन्डर संघटना अध्यक्ष तथा जळके उपसरपंच निवृत्ती अर्जुन पाटील तसेच शिरसोली येथील डॉ.सोपान अर्जुन पाटील यांच्या मातोश्री होत्या त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४:००वाजता जळके येथील राहत्या घरुन निघेल



