

जळगाव : प्रतिनिधी
टीबी मुक्त भारत अभियान राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शहर क्षयरोग केंद्र जळगाव व कोणसा फाउंडेशन पुणे व दीक्षित वाडी मित्र मंडळ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशांत निकुंभ व शहर क्षयरोग अधिकारी डॉ वैभव भारती यांच्या मार्गदर्शनाखाली क्षय रुग्णांना मोफत पोषण आहार (फूड बास्केट) वाटपाचा प्रोग्राम दादासाहेब भिकमचंद जैन हॉस्पिटल शिवाजीनगर येथे घेण्यात आला .
यावेळी श्री विजय बांदल नगरसेवक एडवोकेट पियुष पाटील श्री रविंद्र शिंदे श्री प्रशांत चौधरी डॉ सायली पवार जिल्हा समन्वयक श्री कमलेश आमोदेकर डीपीएस दीपक नांदेडकर एसटीएस मिलिंद भोळे टी बी एच व्ही नितीन पावरा उपस्थित होते यावेळी रुग्णांना पोषण आहार व त्याचे महत्त्व सांगण्यात आले व रुग्णांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सर्व एनटीईपी स्टाफ सर्व जी एन एम, ए एन एम व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते



