

जळगाव : प्रतिनिधी
पत्नी मंदिरात गेलेली असताना घरी एकटेच असलेल्या भावेश पंजूमल मंधान (वय ३७, रा. सिंधी कॉलनी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. २ नोव्हेंबर रोजी सिंधी कॉलनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि , शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भावेश मंधान हे पत्नी, दोन मुलांसह राहत होते. त्यांची पत्नी सेवामंडळात गेलेली होती. त्या वेळी घरी एकटेच असलेल्या मंधान यांनी गळफास घेतला. काही वेळानंतर पत्नी घरी आली, त्या वेळी हा प्रकार लक्षात आला. तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ जमील शेख करत आहेत. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, कर्जामुळे ते तणावात राहत असल्याचे काही जणांकडून सांगितले जात आहे.



