Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिवीगाळ, मारहाण अन् उपाशी ठेवण्याचा आरोप; दहिदुलेतील विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
    क्राईम

    शिवीगाळ, मारहाण अन् उपाशी ठेवण्याचा आरोप; दहिदुलेतील विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

    editor deskBy editor deskOctober 31, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील दहिदुले येथील विवाहित महिलेने आज सकाळी विषारी पदार्थ प्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील दहिदुले येथील विवाहित महिला ललिताबाई पांडुरंग पाटील (वय ४१) यांनी ३० ऑक्टोबरला सकाळी १० वाजता राहत्या घरात काहितरी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केली.

    दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत विवाहितेचे पती, सासु, सासरे, दोन नणंद यांच्याविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ललिताबाई पाटील यांचे पती, सासरे व सासू हे शेतातील गाळ विक्रीचे पैसे त्यांच्या दोन्ही मुलींना देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर, ललिताबाई या पैशांबाबत विचारणा करत असल्याने त्यांना शिवीगाळ, उपाशी ठेवणे, मारहाण करणे असा छळ केला जात होता. या छळला कंटाळूनच ललिताबाई पाटील यांनी आत्महत्या केल्याचा दावा मयत विवाहितेचे बंधू जगदीश पंढरीनाथ पाटील (रा. वटार) यांनी करत ललिताबाईंचे पती पांडुरंग पंढरीनाथ पाटील, सासरे पंढरीनाथ तुकाराम पाटील, सासू विमलबाई पंढरीनाथ पाटील, नणंद मंगलाबाई आधार पाटील व सुरेखाबाई दीपक पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कुलूप तोडून चोरट्यांचा हात साफ : दोन घरांत चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

    October 31, 2026

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर महाजन आणि रत्नाबाई जाधव मैदानात; दोन मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल!

    October 31, 2026

    जिल्हा बँक निवडणुकीसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

    October 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.