Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » यावलला जाताना काळाचा घाला; दुचाकीवरून पडलेल्या ६२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
    क्राईम

    यावलला जाताना काळाचा घाला; दुचाकीवरून पडलेल्या ६२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

    editor deskBy editor deskOctober 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव : प्रतिनिधी 

    दुचाकीने यावलला जात असतांना तोल जावून पडल्यामुळे ज्योती प्रकाश नारखेडे (वय ६२, रा. इंद्रप्रस्थ नगर) हे गंभीर जखमी झाल्या होत्या. ही घटना दि. २२ ऑक्टोंबर रोजी शेळगाव बॅरेजच्या गेटजवळ घडली होती. यातील गंभीर जखमी महिलेचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील इंद्रप्रस्थ नगरात राहणाऱ्या ज्योती नारखेडे या दि. २२ रोजी दुचाकीने यावल येथे जात होत्या.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शेळगाव बॅरेजजवळील गेटजवळ दुचाकीवरुन तोल लावून पडल्यामुळे ज्योती नारखेडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र याठिकाणी उपचार सुरु असतांना त्यांचा दि. २३ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सफौ राजेश मेंढे हे करीत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २१ वर्षीय सनीच्या खून प्रकरणात सहा जणांना पोलिस कोठडी; तपासाला वेग

    October 28, 2026

    वृद्ध महिलेच्या मालमत्तेची परस्पर नोंदणी? मेहरुणमधील जागा प्रकरणी पाच जण अडचणीत

    October 28, 2026

    एका पत्नीचं कुंकू पुसलं, जन्माआधीच बाळ पोरकं झालं! पाळधी-तरसोद बायपासवर २८ वर्षीय योगेशचा मृत्यू!

    October 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.