Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वृद्ध महिलेच्या मालमत्तेची परस्पर नोंदणी? मेहरुणमधील जागा प्रकरणी पाच जण अडचणीत
    क्राईम

    वृद्ध महिलेच्या मालमत्तेची परस्पर नोंदणी? मेहरुणमधील जागा प्रकरणी पाच जण अडचणीत

    editor deskBy editor deskOctober 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    बनावट कागदपत्रे तलाठी कार्यालयात देऊन मेहरुण परिसरातील व्यंकटेश कॉलनीतील ४८३.०९ चौ.मी. जागा परस्पर नावावर करून घेतला. ही घटना दि. २४ फेब्रुवारी ते दि. २२ ऑगस्ट दरम्यान घडली. या प्रकरणी वनिता कैलास पाटील (वय ४५, रा. जोशीपेठ), ममता प्रदीप पाटील (वय ३४, रा. रावेर) या दोन महिलांसह अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील मेहरुण परिसरातील व्यंकटेश कॉलनीमध्ये सुमनबाई रघुनाथ पाटील (वय ७६, रा. इंद्रप्रस्थ नगर) यांची प्लॉट क्रमांक २ मध्ये ४८३.०९ चौ.मी. जागा आहे. सदर वृद्धा सध्या खारघर, जि. रायगड येथे राहतात. त्यांच्या या जागेचे वनिता पाटील, ममता पाटील व इतर ३ जणांनी बनावट कागदपत्रे तयार केले. तीन कागदपत्रे मेहरुण तलाठी कार्यालयात देऊन ही जागा स्वतःच्या नावावर करून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर समुनबाई पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वनिता पाटील, ममता पाटील व इतर ३ जणांविरुद्ध वृद्धा तसेच शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २१ वर्षीय सनीच्या खून प्रकरणात सहा जणांना पोलिस कोठडी; तपासाला वेग

    October 28, 2026

    यावलला जाताना काळाचा घाला; दुचाकीवरून पडलेल्या ६२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

    October 28, 2026

    एका पत्नीचं कुंकू पुसलं, जन्माआधीच बाळ पोरकं झालं! पाळधी-तरसोद बायपासवर २८ वर्षीय योगेशचा मृत्यू!

    October 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.