Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डोळ्यांदेखत ऊस जळून खाक : साकरेतील महिला शेतकऱ्यावर संकटाचा डोंगर !
    क्राईम

    डोळ्यांदेखत ऊस जळून खाक : साकरेतील महिला शेतकऱ्यावर संकटाचा डोंगर !

    editor deskBy editor deskOctober 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील साकरे शिवारात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका महिला शेतकऱ्याचा संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना २६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. गत आठ दिवसांतील ही सलग दुसरी घटना असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. अगोदरच दुष्काळाचे भीषण संकट असताना या आगीमुळे शेतकऱ्यावर ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी अत्यंत हलाखीची परिस्थिती ओढवली आहे.

    साकरे येथील महिला शेतकरी प्रमिलाबाई आत्माराम पाटील यांच्या गट नंबर १४१/१/अ मधील ०.६८ हेक्टर क्षेत्रातील उभा ऊस विजेच्या तारांमधील शॉर्ट सर्किटमुळे पेटला. वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले आणि डोळ्यांदेखत संपूर्ण ऊस भस्मसात झाला. यामुळे संबंधित महिला शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. महावितरणने परिसरातील विद्युत ट्रान्सफॉर्मर तसेच लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. पीडित महिला शेतकऱ्याला शासन व महावितरणने तात्काळ आर्थिक भरपाई द्यावी; अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जयदीप पाटील यांनी दिला. दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच महावितरण व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणचे अधिकारी ललित नारखेडे, रवी महाजन, शरद गुजर, हर्षा नारखेडे तसेच तलाठी संदेश महाजन आणि कोतवाल शितलकुमार पवार यांच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. शासनाने आता पीडित महिला शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    किनगावात पथसंचलनावरून तणाव : दगडफेक प्रकरणी १०० हून अधिक जणांवर गुन्हा, १६ जणांना अटक !

    October 27, 2026

    जुन्या भांडणाचा पुन्हा उद्रेक; आसोद्यात बाप-लेकावर हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा

    October 27, 2026

    वाळूमाफियांवर कारवाईसाठी रात्रीचा छापा; कच्च्या रस्त्यावर दुचाकी घसरली, तहसीलदार जखमी

    October 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.