Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » किनगावात पथसंचलनावरून तणाव : दगडफेक प्रकरणी १०० हून अधिक जणांवर गुन्हा, १६ जणांना अटक !
    क्राईम

    किनगावात पथसंचलनावरून तणाव : दगडफेक प्रकरणी १०० हून अधिक जणांवर गुन्हा, १६ जणांना अटक !

    editor deskBy editor deskOctober 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील किनगाव येथे विजया दशमीनिमित्त रविवारी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पथसंचलन होते. या पथसंचलनास एका धार्मिक स्थळासमोरून नेण्यास विरोधावरून पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत तब्बल १०० हुन अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील १६ जणांना अटक करण्यात आली असून या सर्वांना सोमवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना ३१ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर गावात चोख चोख पोलिस बंदोबस्त लावला असून डीवायएसपी तळ ठोकून आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार,  किनगाव येथील चुंचाळे रोडावरील एका धार्मिक स्थळासमोरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनास विरोध दर्शवतांना रस्ता अडवण्यात आला होता. तर, या समुदायास बळाचा वापर करून रस्त्यावरून हटवतांना झालेल्या दगडफेकीत एका पोलिस उपनिरिक्षकासह ७ जण जखमी झाले होते. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक अनिल महाजन यांच्या फिर्यादीवरून १०० हुन अधिक जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हारुण नसिर पिंजारी, अक्षय संतोष साळुंखे, भूषण शिवाजी साळुंखे, इरफान खान शेर खान, आजिम शेख कलिम, अल्ताफ कडषू पिंजारी, कलीम शकील पिंजारी, आसीफ मुस्ताक खाटीक, समीर खान शकील खान, वसीम खान अबूब खान, रियाज राजू तडवी, रिहान इकबाल फकीर, समीर खान युनूस खान, शेख जावीद शेख कलीम, इम्रान फारुख बागवान, रहीम शहा रमजान शहा फकीर या १६ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना सोमवारी यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायधीश आर. एस. जगताप यांच्या समोर हजर केले असता या सर्वांना ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात सपोनि अजयकुमार वाढवे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    डोळ्यांदेखत ऊस जळून खाक : साकरेतील महिला शेतकऱ्यावर संकटाचा डोंगर !

    October 27, 2026

    जुन्या भांडणाचा पुन्हा उद्रेक; आसोद्यात बाप-लेकावर हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा

    October 27, 2026

    वाळूमाफियांवर कारवाईसाठी रात्रीचा छापा; कच्च्या रस्त्यावर दुचाकी घसरली, तहसीलदार जखमी

    October 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.