Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाळूमाफियांवर कारवाईसाठी रात्रीचा छापा; कच्च्या रस्त्यावर दुचाकी घसरली, तहसीलदार जखमी
    क्राईम

    वाळूमाफियांवर कारवाईसाठी रात्रीचा छापा; कच्च्या रस्त्यावर दुचाकी घसरली, तहसीलदार जखमी

    editor deskBy editor deskOctober 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी 

    नुकतीच वरिष्ठ पदावर पदोन्नती झालेली, बदलीचे अधिकृत आदेश हातात पडण्यास अवघे काही दिवस शिल्लक होते. अशा टप्प्यावर बहुतांश अधिकारी जोखीम न पत्करता शांततेत दिवस काढणे पसंत करतात. मात्र, येथील तहसीलदारांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. यातच झालेल्या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. या कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांनी वाळू माफिकाविरुद्ध थेट ‘ऑन-द-स्पॉट’ धडक कारवाईचा पवित्रा घेतला. रात्री वाक रस्त्यावरील नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाची गोपनीय पाहणी करण्यासाठी आमडदे येथील तलाठ्याच्या खासगी दुचाकीवर मागे बसून जात असताना, रस्त्यावरील खडीमुळे गाडी घसरली. या अपघातात तहसीलदार शीतल सोलाट यांच्या पायाला गंभीर इजा झाली. त्यांच्या पायाला टाके पडले असून, डॉक्टरांनी त्यांना १५ दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शासकीय सेवेतील शेवटच्या टप्प्यातही स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या या महिला अधिकाऱ्याच्या धडाडीची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान, भडगाव परिसरातील नदीपात्रातून रात्री बेकायदेशीर वाळूची चोरटी वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. अशा वेळी कारवाईतील गोपनीयता १०० टक्के कायम रहावी आणि स्वतः जागेवर जाऊन खात्री करावी, यासाठी तहसीलदार शीतल सोलाट यांनी शासकीय बडेजावाची वाट न पाहता आमडदे येथील तलाठी यांच्या खासगी दुचाकीवर पाठीमागे बसून थेट घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, रात्री ९ वाजेच्या सुमारास वाक रस्त्यावरून नदीपात्राकडे जाणाऱ्या कच्च्या मार्गावर खडी व निसरड्या मातीमुळे दुचाकीचे चाक अनपेक्षितपणे घसरले. दुचाकीचा तोल ढळून दोघेही रस्त्यावर पडले. गाडी अंगावर आल्याने तहसीलदार शीतल सोलाट यांच्या पायाला गंभीर इजा झाली. घटनेनंतर सोबत सहका-यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या पायावर टाके घातले असून पुढील १५ दिवस त्यांना सक्तीच्या आरामाचा सल्ला दिला आहे. तर, सोबत असलेल्या तलाठींनाही मुका मार लागला आहे. या घटनेनंतर महसूल व पोलीस यंत्रणेने तालुक्यातील वाळू माफियांची नाकेबंदी कडक केली आहे. अशा अडथळ्यांनी मोहीम थांबणार नसून संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे

    तहसीलदार शीतल सोलाट यांची नुकतीच वरिष्ठ संवर्गात पदोन्नती झाली असून पुढील महिन्यात त्यांच्या नवीन पदस्थापनेचे अधिकृत आदेश आस्थापनेकडून प्राप्त होणार आहेत. बदलीच्या तोंडावर रात्री वाळू माफिकांशी कुणीही संघर्ष ओढवून घेत नाही. मात्र, शासकीय महसुलाचे रक्षण आणि पर्यावरणाची लूट थांबवण्यासाठी महिला अधिकाऱ्याने दाखवलेल्या या धाडसाचे आणि त्यांना साथ देणारे तलाठी यांच्या कर्तव्यनिष्ठेचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    डोळ्यांदेखत ऊस जळून खाक : साकरेतील महिला शेतकऱ्यावर संकटाचा डोंगर !

    October 27, 2026

    किनगावात पथसंचलनावरून तणाव : दगडफेक प्रकरणी १०० हून अधिक जणांवर गुन्हा, १६ जणांना अटक !

    October 27, 2026

    जुन्या भांडणाचा पुन्हा उद्रेक; आसोद्यात बाप-लेकावर हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा

    October 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.