Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात युवासेनेला धक्का! उपजिल्हा संघटक विनोद रोकडे यांचा राजीनामा
    धरणगाव

    धरणगावात युवासेनेला धक्का! उपजिल्हा संघटक विनोद रोकडे यांचा राजीनामा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 24, 2026Updated:October 24, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेचे उपजिल्हा संघटक विनोद सुरेश रोकडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांच्याकडे त्यांनी लेखी राजीनामा सुपूर्द केला. सोशल मीडियावर पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडणारा चेहरा म्हणून ओळख असलेल्या रोकडे यांच्या राजीनाम्यामुळे धरणगावातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

    स्थानिक नेतृत्वावर नाराजी; राजीनाम्यामागे अंतर्गत परिस्थितीचे कारण?

    विनोद रोकडे हे फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देत पक्षाची भूमिका ठामपणे मांडत होते. त्यामुळे युवासेनेतील आक्रमक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत त्यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्याने पक्षासाठी हा धक्का मानला जात आहे.

    रोकडे यांनी आपल्या राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला असला, तरी पक्षातील अंतर्गत परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. स्थानिक नेत्यांची हुकूमशाही, नातेवाईक आणि मर्जीतील व्यक्तींनाच पदे दिली जाणे, तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होणे, समाजातील काही व्यक्तींनाच न्याय मिळणे तसेच अल्पसंख्याक समाजावर अन्याय होत असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.

    ‘राजकारणात निष्ठेपेक्षा पैसा महत्त्वाचा!’

    राजकारणातील सद्यस्थितीवर भाष्य करताना रोकडे यांनी निष्ठा आणि जनसंपर्कापेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिले जात असल्याची खंत व्यक्त केली. तरुणांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असा रोखठोक सल्लाही त्यांनी दिला.

    दरम्यान, विनोद रोकडे यांच्या राजीनाम्यामुळे धरणगावातील ठाकरे गटाच्या युवासेनेत पुढे काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या निर्णयाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगावातील जबरी चोरी प्रकरणाला वेग; दोन फरार आरोपींना जळगाव एलसीबीने पकडले

    October 22, 2026

    धरणगाव : अल्पवयीन मुलगी गर्भवती; ४३ वर्षीय आरोपी अटकेत !

    September 27, 2026

    पाळधीतील स. न. झंवर विद्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ

    September 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.