Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पारोळ्यात अपघाताची थरारक घटना : दुचाकीस्वाराचा मृत्यू, धडक देऊन चालक फरार
    क्राईम

    पारोळ्यात अपघाताची थरारक घटना : दुचाकीस्वाराचा मृत्यू, धडक देऊन चालक फरार

    editor deskBy editor deskOctober 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी 

    शहरातील महामार्गावर असलेल्या तलाठी कॉलनीजवळ पिकअप गाडीने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिल्याने २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा शहरातील महार्गाजवळ २२ रोजी सायंकाळी ७ वाजता तालुक्यातील म्हसवे येथील विशाल संजय पाटील (वय २६) हे दुचाकी (एमएच- १९, डीसी- ६९६८) ने पारोळा येथे कामानिमित्त येत येत होते. तर, पारोळ्याकडून जळगावाकडे जाणारी पिकअप गाडी (एमएच ४७, एबी-५९३२) ने तलाठी कॉलनीजवळ दुचाकीवर असलेल्या विशाल पाटील यास जबर धडक दिली. या दुर्दैवी अपघातात विशालच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, घटनेनंतर पिकअप गाडीचा चालक फरार झाला आहे. याबाबत चिंतामण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास साळुंखे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पान-सिगारेट देण्यास नकार दिला अन् कोयता-तलवारीने हल्ला! जळगावात खळबळ; १२ तासांत तिघे अटकेत!

    October 24, 2026

    दारूच्या नशेत घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; सुरीच्या हल्ल्यात दोघे जखमी

    October 24, 2026

    जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला सुरुवात! २९ नोव्हेंबरला मतदान; सर्वपक्षीय पॅनल की महायुती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    October 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.