Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नवरात्रोत्सवापूर्वी आदिशक्ती भवानी माता मंदिर परिसर चकाचक; स्वच्छता व सुशोभीकरण मोहीम!
    जळगाव

    नवरात्रोत्सवापूर्वी आदिशक्ती भवानी माता मंदिर परिसर चकाचक; स्वच्छता व सुशोभीकरण मोहीम!

    editor deskBy editor deskOctober 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    येथील आदिशक्ती भवानी माता मंदिर परिसरात आगामी नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून नुकतीच एक भव्य स्वच्छता मोहीम व सुशोभीकरण उपक्रम पार पडला. या उपक्रमात मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे स्वच्छ करून सुंदर व नयनरम्य रांगोळ्यांच्या माध्यमातून मंदिर परिसर अतिशय आकर्षक, प्रसन्न व पवित्र करण्यात आला आहे.

    महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री .गुलाबरावजी पाटील, युवा नेते श्री. प्रतापराव पाटील व नगरसेवक श्री. पप्पू भाऊ भावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक व धार्मिक सेवेची परंपरा जपत सामाजिक कार्यकर्ते किरण भाऊ महाजन व देश प्रेमी महिला मंडळ यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने हा अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला. या मोहिमेअंतर्गत मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छता करून चकाचक करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावातील जबरी चोरी प्रकरणाला वेग; दोन फरार आरोपींना जळगाव एलसीबीने पकडले

    October 22, 2026

    बड्यांना सूट, छोट्यांवर कारवाई? मनसेचा जळगाव महापालिकेला ७ दिवसांचा अल्टिमेटम!

    October 22, 2026

    बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या : घुग्घुस आंदोलनाप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

    October 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.