Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बड्यांना सूट, छोट्यांवर कारवाई? मनसेचा जळगाव महापालिकेला ७ दिवसांचा अल्टिमेटम!
    जळगाव

    बड्यांना सूट, छोट्यांवर कारवाई? मनसेचा जळगाव महापालिकेला ७ दिवसांचा अल्टिमेटम!

    editor deskBy editor deskOctober 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील अतिक्रमण कारवाईत मोठ्या व्यावसायिकांना सूट देऊन छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या कथित दुजाभावाविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित मोठ्या व्यावसायिकाचे अतिक्रमण हटविण्यासह छोट्या व्यावसायिकांना न्याय देण्याची मागणी केली आहे. येत्या सात दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी दिला आहे.

    मनसेच्या म्हणण्यानुसार, जळगाव शहरातील एका मोठ्या व्यावसायिकाने छोट्या व्यावसायिकांविरोधात महापालिकेकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास मज्जाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, संबंधित मोठ्या व्यावसायिकाचे स्वतःचे अतिक्रमण रस्ता, फुटपाथ आणि चौकाच्या परिसरात असल्याचा दावा मनसेने केला आहे. छोट्या व्यावसायिकांवर कारवाई होत असताना मोठ्या व्यावसायिकाच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे.

    या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार केला असून, एक दिवसीय आंदोलनही केले होते. तरीदेखील अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा दावा मनसेने केला आहे. महापालिकेने अतिक्रमणाबाबत सर्वांसाठी समान नियम लागू करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

    मनसेने महापालिका प्रशासनाकडे पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. संबंधित मोठ्या व्यावसायिकाचे अतिक्रमण नियमानुसार तातडीने हटवावे, त्याच्यावरही नियमांनुसार कारवाई करावी, छोट्या व्यावसायिकांवरील दंडात्मक कारवाई थांबवावी आणि सर्वांना समान नियम लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, छोट्या व्यावसायिकांना रस्त्याच्या कडेला नियमानुसार जागा निश्चित करून पट्टे आखून द्यावेत, अशीही मागणी मनसेने केली आहे.  छोट्या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह लक्षात घेऊन महापालिकेने योग्य तोडगा काढावा. प्रशासनाला अडचण होणार नाही आणि व्यावसायिकांनाही व्यवसाय करता येईल, अशी व्यवस्था निर्माण करावी, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.

    सात दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन

    महापालिका प्रशासनाने सात दिवसांच्या आत मागण्यांवर कार्यवाही केली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रीकृष्ण मेंगडे यांनी दिला आहे. छोट्या व्यावसायिकांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    यावेळी मनसेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, वाहतूक सेनेचे रज्जाक सय्यद, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, राजेश मराठे, समाधान सपकाळे यांच्यासह छोटे व्यावसायिक सुरेश सोनार, सविता सुरवाडे, शारदा सुरडके, अजय भाई, रमेश भाई आणि अन्य व्यावसायिक उपस्थित होते. ता मनसेच्या या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि अतिक्रमणाच्या प्रश्नावर सर्वांसाठी समान निकष लागू होतात का, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावातील जबरी चोरी प्रकरणाला वेग; दोन फरार आरोपींना जळगाव एलसीबीने पकडले

    October 22, 2026

    नवरात्रोत्सवापूर्वी आदिशक्ती भवानी माता मंदिर परिसर चकाचक; स्वच्छता व सुशोभीकरण मोहीम!

    October 22, 2026

    बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या : घुग्घुस आंदोलनाप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

    October 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.